आपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का?
आपल्या देशाची घटना सेक्युलर आहे असे सर्व पुरोगामी विचारवंत सांगतात; पण ती खरोखरच शंभर टक्के सेक्युलर आहे का? सेक्युलर शब्दाचा अर्थ निधर्मी, धर्म न मानणारा किंवा ईहवादी असा आहे. आपल्या देशाला केवळ अधिकृत धर्म नाही म्हणून आपला देश/घटना सेक्युलर आहे असा याचा अर्थ होत नाही. तेव्हा नेमकी परिस्थिती काय आहे ते पाहू या. ईहवादी (सेक्युलर) …